पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या शाळांवर कारवाई

पुणे, १९ जून २०२१: सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खालील खाजगी प्राथमिक शाळा शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत असून यापूर्वी सदर शाळांना शाळा बंद करणेबाबत नोटीसही दिलेल्या होत्या. असे असतानाही या शाळा अनधिकृतरित्या चालू ठेवण्यात आलेल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित पालकांना या कळविण्यात येते की, त्यांनी आपल्या पाल्यास या अनाधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेवू नये. या अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास त्यांच्या पाल्याच्या होणा-या शैक्षणिक नुकसानीस ते स्वत: जबाबदार राहतील. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तसेच या संबंधित शाळा चालकास कळविण्यात येते की, त्यांनी शासन परवानगी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. अनधिकृतपणे शाळा सुरु केल्यास किंवा चालू ठेवल्यास दिनांक १९/०६/२०१० अन्वये त्यांचे विरुध्द प्रशासनाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अनधिकृत खाजगी शाळांची यादी पुढीलप्रमाणे
१) मास्टर केअर इंग्लिश स्कुल, भोसरी
२)ज्ञानराज प्राथमिक शाळा, कासारवाडी
३)ज्ञानसागर इंग्लिश स्कुल ( प्राथमिक) चिखली
४)मॉर्डन पब्लिक स्कुल, रहाटणी
५) एम. एस. स्कुल फॉर किड्स, सांगवी
६) ग्रँट मीरा इंग्लिश मिडीयम स्कुल, कुदळवाडी