पुणे, १/०९/२०२१: हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेने छापा टाकून हॉटेल मालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. कारवाईमध्ये २ लाख ३ हजारांचे हुक्का फ्लेवर्स, अकरा हुक्का पॉट, चिलीम पाईप व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
तलब हॉटेलचे मालक सचिन अशोक रणपिसे (वय ३०, रा. येरवडा), अमर संतोष गायकवाड (वय २६) आणि हॉटेलचे व्यवस्थापक दिलीपकुमार मांगीलाल मालविया (वय २६, रा. हडपसर) यांच्यावर सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमाननगर येथील देवकर चौक येथील तलब हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्काबार सुरू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या पथकान हॉटेलमधून हजारांचे हुक्का फ्लेवर्स, अकरा हुक्का पॉट, चिलीम पाईप व दोन दुचाकी जप्त केल्या.
ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या पथकाने केली.
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार