दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारावर एमपीडीएनुसार कारवाई – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ७४ वी कारवाई

पुणे, २५ ऑगस्ट २०२२: दहशत माजविणाऱ्या आणखी एका सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीएनुसारस्व कारवाई केली आहे. त्याला एक वर्षांसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांची ही ७४ वी कारवाई ठरली आहे. स्वप्नील किसन भालेकर (वय २७) असे कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. स्वप्नील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. विमानतळ, येरवडा, विश्रांतवाडी या परिसरात त्याने दहशत पसरवली असून, त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीकृत्ये सुरूच असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ट निरीक्षक भरत जाधव यांनी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्फत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठविला होता. त्यानूसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्यावर कारवाई केली.