December 3, 2025

चुकीचे स्टेट्स ठेवणाऱ्यांवर कारवाई करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, १ ऑगस्ट २०२५: यवत येथे बाहेरच्या व्यक्तीने पुजाऱ्याने बलात्कार केला आहे असे चुकीचे स्टेट्स मोबाईलला ठेवल्यामुळे वाद निर्माण झाला, लोक रस्त्यावर आले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. पण आता परिस्थिती नियंत्रणात असून, दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसून तणाव निवळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काही लोक जाणीवपूर्वक चुकीचे स्टेट्स ठेवून लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सभा झाली म्हणून एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर चुकीचे स्टेट्स ठेवण्याची कोणाला मुभा दिलेली नाही. सभेचा आणि या घटनेचा संबंध नाही. सभा झाली म्हणून आम्ही स्टेट्स ठेवले असे म्हणणे सहन केले जाणार नाही. यवत येथे शांतता आहे, आता हे व्हिडिओ येथील आहेत की बाहेरचे हे तपासावे लागले. त्याबाबत चौकशी केली जाईल. कोणी चुकीचे काम करत असेल तर पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील, त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.