पुणे, ६ आॅक्टोबर २०२२: महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये दहा शिक्षक महापालिकेच्या तर चार शिक्षक खासगी शाळांमधील आहेत.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण ५९ प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाकडे आले होते. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती नेमण्यात आली होती. त्यातून निवडण्यात आलेल्या आदर्श शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच टॅब देऊन गौरविण्यात येईल.
महापालिकेच्या शाळांमध्ये अंकुश माने (विद्यानिकेतन क्रमांक १९, कात्रज), ज्ञानेश हंबीर (मनपा शाळा क्र. १८१ मुलांची, खराडी), नवनाथ भोसले (मनपा शाळा क्र. १९, मुलींची खराडी), रजनी गोडसे (मनपा शाळा क्र ९९, मुलींची, वडगावशेरी), हेमलता चव्हाण )विद्यानिकेतन क्र. १९ कात्रज), विजय माने (क्रीडानिकेतन ८३ बी, हडपसर), राणी कुलकर्णी (मनपा शाळा क्र.१६२ बी, कात्रज), चित्रा पेंढारकर (मनपा शाळा क्र ७४ जी, वारजे), स्मिता धारूरकर (मनपा शाळा क्र १६८ बी, हिंगणे खुर्द), वर्षा पंचभाई (मनपा शाळा क्र. ९७ जी, ढोले पाटील रस्ता )
नवीन मराठी शाळेच्या पुष्पा देशमाने, चंद्रकांत दांगट पाटील विद्यालयाच्या रोहिणी हेमाडे, विमाननगरच्या हिंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या डॉ. प्रीती मानेकर व मएसोच्या शुभदा दीपक शिरोडे यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. शिक्षण विभागाच्या प्राथमिक प्रशासकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी राऊत व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एम. आर. जाधव यांनी दिली.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा