पुणे, २७ मे २०२५: पुणे शहरात पावसाळी गटार सांडपाणी वाहिन्यांना जोडण्यात आलेली आहेत. ही चुकीची कामे आता पुणेकरांची डोकेदुखी ठरत आहेत. मुसळधार पावसात पावसाळी गटारांतील पाणी थेट सांडपाणी वाहिन्यांमध्ये जाऊन या चेंबरमधीलपाणी रस्त्यावर येत असल्याचे दिसून येतं आहे. त्यावर आता अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिवस पाळी आणि रात्रपाळीतही सक्सेशन मशिन, जेटींग मशिनचा वापरून चेंबर साफ करण्याचे आदेश दिले आहेत.
पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यास चेंबरमध्ये गाळ साचल्याने व क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्याने सांडपाणी वाहिनी व त्यांचे चेंबर फुटत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे हे चेंबर साफ करण्यासाठी सक्सेशन मशिन व जेटींग मशिनचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. महापालिकेकडे ८ सक्सेशन मशिन तर २५ जेटींग मशिन आहेत. त्याचा वापर करून चेंबरची सफाई केली जाणार आहे.
महापालिकेकडून शहरात सुमारे २२३ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यावर सुमारे ५६,००० चेंबर आहेत. पण पूर्वीच्या काळी नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या संगनमताने पावसाळी गटारे पूर्ण न टाकता किंवा ते ओढ्यात, नदीला न सोडता सांडपाणी वाहिन्यांना किंवा त्यांच्या चेंबरला जोडल्या आहेत. हे काम भूमिगत असल्याने ते तपासणेही अवघड जाते. पण पाऊस पडल्यानंतर या कामातील घोटाळे उघडकीस येत आहेत. त्यामुळे अनेक रस्त्यांवरील सांडपाणी वाहिन्यांमधील चेंबरमधून पाणी बाहेर येत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते.
पुणेकरांना तूर्त दिलासा मिळण्यासाठी रिसायकल मशिन, जेटींग मशिनने चेंबरमधील गाळ काढावा. त्यासाठी हे मशिन दिवसा व रात्रीच्या वेळेला वापरून कामाची गती वाढवावी, असे आदेश दिले आहेत.

 
                                                                             
                                                                             
                                                                             
                                                                             
                                                                             
                 
                                         
                                         
                                         
                                        
More Stories
Pune: तबलावादन आणि गायनाने युवा तालचक्र महोत्सवाला सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन
‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’च्या बोधचिन्हाचे आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण