एमएसएलटीए मास्टर्स टेनिस स्पर्धेत अधिराज दुधाणे, मायरा शेख, प्रज्ञेश शेळके, स्वानिका रॉय, अर्णव पापरकर, मेहक कपूर यांचा विजय

पुणे, 26 डिसेंबर 2022 : एमएसएलटीए मास्टर्स 10 , 12 व 14 वर्षांखालील टेनिस स्पर्धेत  राऊंड रॉबिन फेरीत अधिराज दुधाणे, मायरा शेख, प्रज्ञेश  शेळके, स्वानिका रॉय, अर्णव पापरकर व मेहक कपूर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट पुणे, येथे सूरू असलेल्या 10 वर्षांखालील गटात राऊंड रॉबिन फेरीतपहिल्या दिवशी मुलांच्या गटात पहिल्या सामन्यात पुण्याच्या अधिराज दुधाणेने तक्षील नागरचा 4-1, 4-0 असा तर, दुसऱ्या सामन्यात अधिराजने सोलापूरच्या यशवंतराजे पवारचा 4-0, 4-0 असा एकतर्फी पराभव केला.10 वर्षांखालील मुलींच्या गटात मायरा शेखने समिक्षा शेट्टीचा 4-1, 4-0 असा तर,नक्षत्रा अय्यर हिने अविघ्ना अंतडला 4-2, 5-3 असे पराभूत केले. मुंबईच्या तमन्ना नायरने शौर्या पाटीलचा 4-0, 4-0 असा सहज पराभव केला.

नाशिक जिल्हा टेनिस असोसिएशन टेनिस कोर्ट येथे सूरू असलेल्या 12 वर्षांखालील गटात मुलांच्या गटात प्रज्ञेश  शेळके, दक्ष पाटील, वरद उंद्रे , ध्रुव शेगल , ऋषिकेश माने व दर्श खेडेकर तर मुलींच्या गटात रितिका डावलकर, वृंदिका राजपूत, स्वानिका रॉय   व जान्हवी चौघुले यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन टेनिस कोर्ट येथे सूरू असलेल्या 14 वर्षांखालील गटात मुलांच्या गटात अर्णव पापरकर, आयुष पुजारी , विश्वजीत सणस   व शिवतेज शिरफुले  तर मुलींच्या गटात मेहक कपूर, सेजल भुतडा  व आकृती सोनकुसरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:  राऊंड रॉबिन:
10 वर्षाखालील मुले:(पुणे)
आरव चालानी वि.वि सोहम राठोड 5-3, 4-0
वीर गायकवाड  वि.वि   नीव शेठ 1-4, 4-2, 7-5;
अधिराज दुधाणे  वि.वि  तक्षील नागर 4-1, 4-0;
तक्षील नागर वि.वि श्लोक अलंद 4-0, 4-0
अधिराज दुधाणे  वि.वि  यशवंतराजे पवार 4-0, 4-0

10 वर्षांखालील मुली: (पुणे)
मायरा शेख वि.वि  समिक्षा शेट्टी 4-1, 4-0;
नक्षत्रा अय्यर  वि.वि   अविघ्ना अंतड 4-2, 5-3;
तमन्ना नायर  वि.वि   शौर्या पाटील 4-0, 4-0

12 वर्षांखालील मुले:(नाशिक)
प्रज्ञेश  शेळके   वि.वि  ऋषिकेश माने 4-2, 4-1
दक्ष पाटील   वि.वि  ध्रुव शेगल 4-1, 4-1
वरद उंद्रे   वि.वि  मनन राय  4-2, 2-4, 7-2
दक्ष पाटील  वि.वि  वरद उंद्रे 4-2, 4-0
ध्रुव शेगल   वि.वि   मनन राय 4-2, 4-2
ऋषिकेश माने  वि.वि  जय गायकवाड 4-2, 5-3
दर्श खेडेकर  वि.वि  प्रज्ञेश  शेळके  5-4(6), 4-1
दर्श खेडेकर   वि.वि  जय गायकवाड 5-4(6), 4-0

12 वर्षांखालील मुली:(नाशिक)
रितिका डावलकर  वि.वि   रित्सा कोंडकर 4-0, 4-1
वृंदिका राजपूत  वि.वि   ईशाल पठाण 4-1, 4-1
स्वानिका रॉय  वि.वि  जान्हवी चौघुले 4-0, 4-0
जान्हवी चौघुले  वि.वि   ईशाल पठाण 2-4, 4-0, 7-2

14 वर्षांखालील मुले: (कोल्हापूर)
अर्णव पापरकर  वि.वि शिवतेज शिरफुले 4-0, 4-1
अर्णव पापरकर   वि.वि  मन्नान अग्रवाल  4-0, 4-0.
आयुष पुजारी   वि.वि ओम वर्मा  4-1, 4-2.
आयुष पुजारी   वि.वि  अवनीश चाफळे 1-4,4-2,(7-5).
विश्वजीत सणस   वि.वि  अवनीश चाफळे  4-2, 5-3.
विश्वजीत सणस   वि.वि   मन्नान अग्रवाल 1-4, 4-0, (8-6).
शिवतेज शिरफुले   वि.वि  ओम वर्मा 4-2,4-0

14 वर्षांखालील मुली: (कोल्हापूर)
मेहक कपूर  वि.वि  देवश्री महाडेश्वर 4-0, 4-1
सेजल भुतडा   वि.वि  सायेत्ते वराडकर  4-2, 4-1
आकृती सोनकुसरे वि.वि  रिद्धी शिंदे 4-0, 4-5, 10-4