बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट’ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना घेता येणार प्रवेश

पुणे, १९ जुन २०२१- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’ (पुम्बा) मध्ये ‘बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट’च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यापीठातील ‘डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’ मध्ये अनेक अभ्यासक्रम चालवले जातात. त्यापैकी हा ‘बीबीए’ चा तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम आहे. या पदवी अभ्यासक्रमासाठी कला, वाणिज्य, विज्ञान व व्होकेशनल या कोणत्याही शाखेतून इंग्रजी हा विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण आवश्यक आहेत.

या अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती देताना विभागाच्या प्रमुख डॉ. सुरभी जैन म्हणाल्या, वेगाने वाढत असलेल्या क्षेत्रात संधी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. यामध्ये प्रात्यक्षिक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष सहभाग, उद्योग जगताशी ओळख अश्या अनेक अंगांचा समावेश केला आहे.

कोट
‘फॅसिलिटीज मॅनेजमेंट’ क्षेत्रात आपण चांगले संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झालो असल्याने नवपदवीधरांना नोकरीची संधीही उपलब्ध करून देऊ शकू. मात्र या अभ्यासक्रमाची व्याप्ती पदवीपर्यंत मर्यादित नसून पुढील काळात ‘फॅसिलिटी मॅनेजमेंट’ क्षेत्रात अनेक संधी निर्माण करणारी आहे.

  • डॉ. प्रफुल्ल पवार, संचालक स्कुल ऑफ बिजनेस व कुलसचिव,
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अधिक माहितीसाठी- http://www.pumba.in/program/mba-bba-process.htm