‘रिपाइं’च्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता मंदार जोशी यांची नियुक्ती

पुणे, ०२/११/२०२२: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता मंदार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमा आठवले यांच्या हस्ते ॲड अर्चिता मंदार जोशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच त्यांचा रामदास आठवले व सीमा आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महिला प्रदेश अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. ॲड अर्चिता मंदार जोशी या पुणे बार असोसिएशनच्या विद्यमान सदस्य असून, अनेक संस्थांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण महासंघाच्या कार्याध्यक्षा आहेत.महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या कायम अग्रेसर आहेत.

सर्व समाजाच्या महिलांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा व कायदेशीर मार्गाने महिलांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तसेच ‘रिपाइं’ पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ॲड अर्चिता मंदार जोशी यांनी सांगितले.