पिंपरी, ९ जानेवारी २०२२: पिंपरी चिंचवडमधील चिखली येथील रहिवासी असलेले प्रशांत गाडे (वय ५०) यांचा नुकतेच ब्रेन हेमरेज होऊन मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अलका गाडे यांनी पती प्रशांत यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेत, समजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
प्रशांत गाडे हे मूळचे साताऱ्यातील कराडचे रहिवाशी होते. ते व्यवसायानिमित्ताने आपल्या कुटुंबासह कराडहून पिंपरी येथील चिखली येथे स्थायिक झाले. त्यांनी चिखलीत घरगुती खानावळीचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. मग कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलला फेडरल सेक्युरिटी म्हणून कामावरती रुजू झाले.
प्रशांत हे पिंपरी येथून कामानिमित्त पुण्यात आले असता दुचाकी गाडीवर बसलेल्या अवस्थेत बेशुद्ध झाले. परिसरातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांना संचिती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर प्रशांत गाडे यांची परिस्थिती गंभीर असल्या कारणाने त्यांना वल्लभनगर येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटल ला नेण्यात आले, तिथे त्यांच्यावरती उपचार सुरु झाला. मात्र ४ जानेवारी रोजी रात्री १०:३0 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रशांत यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अलका यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. जे माझ्या कुटुंबासोबत घडलं ते दुसऱ्यांसोबत घडू नये, या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला आणि समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा