पुणे, २२ जून २०२१: मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून मंत्रालयात बॉम ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीस मुंढवा पोलिसांनी सोमवारी रात्री घोरपडी परिसरातून ताब्यात घेतले. त्याने धमकीचा फोन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शैलेंद्र शिंदे ( रा. घोरपडी) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने ३० मे २०२१ रोजी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
मंत्रालय परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती फोनवरुन देण्यात आली होती. त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीसांचा मोठा फौजफाटाही मंत्रालय परिसरात तैनात करण्यात आला होता. धमकीचा फोन कोणी केला? याचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात होता. त्यानुसार संबंधित फोन पुण्यातून केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होती. आरोपी मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोरपडी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मुलाचे शाळेत अॅडमिशन झाले नसल्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास मरीन ड्राईव्ह पोलिस करीत आहेत.
More Stories
बेकायदेशीरपणे हुक्का पार्ट्यांचे आयोजन करणा-या बड्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांकडून कारवाई; तीन जणांविरुद्ध गुन्हा तर सुमारे 90 हजाराचा मुद्देमाल जप्त
डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय
एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अजमीर शेख, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद