पुणे, १९/०८/२०२५: मुस्लिम धर्मियांसाठी महत्वपूर्ण असलेली हजरत महंमद पैगंबर यांची जयंती यंदाच्या वर्षी ५ सप्टेंबरला असली तरी याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने धार्मिक सलोखा राखण्यासाठी पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे सिरत कमिटीने घेतला आहे. सुरत कमिटीच्या या निर्णयाचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वागत करत कमिटीचे आभार व्यक्त केले आहे.
आज पुणे पोलिस आयुक्त यांचे समवेत सिरत कमिटी पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे सोबत सहपोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा , पोलिस उपायुक्त भाजीभाकरे व सिरत कमिटीचे मौलाना जमिरुद्दीन , रफिउद्दीन शेख, सिराज बागवान, असिफ शेख, जावेद खान, आबीद सय्यद, अन्सार पिंजारी, मौलाना खालिद निजामी इत्यादी उपस्थितीत होते.
सिरत कमिटीच्या वतीने सकाळी ९ वाजता पारंपरिक मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सदर मिरवणूक नाना पेठ येथील मनुशाह मस्जिद येथुन सुरु होवुन सिटी जामा मस्जिद येथे समारोप होईल.
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर