जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन परिसंवाद

पुणे, दि. 6/5/2021: राज्यातील पर्यटन, कृषी पर्यटनातील संधी, करोना नंतरचे पर्यटन धोरण अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

जगभरात 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जागतिक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी),पर्यटन संचालनालय आणि ऍग्रो टुरिझम विश्व यांच्यातर्फे ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 8 ते 16 मे दरम्यान दररोज संध्याकाळी 7 वाजता हा परिसंवाद होणार असून, कृषी पर्यटन केंद्र चालक, कृषी पर्यटन केंद्र सुरू करू इच्छिणारे, पर्यटनातील विद्यार्थी, अभ्यासक आणि पर्यटनविषयक आवड असणारे नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतील. याबाबत ऍग्रो टुरिझम विश्व यांच्या फेसबुक पेजवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

या परिसंवादात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन संचालनालय आणि ऍग्रो टुरिझम विश्व या तिन्ही संस्थांचे प्रतिनिधी तसेच पर्यटन आणि त्याच्याशी निगडित क्षेत्रातील अभ्यासक मार्गदशन करणार आहे, अशी माहिती एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.