कृषि संजीवनी मोहीम २०२३ शिंदवणे येथे शुभारंभ

पुणे दि.22:  कृषि विभागाच्या कृषि संजीवनी मोहीम 2021 चे उद्घाटन श्री. संत यादवबाबा मंदिर, शिंदवणे येथे कृषि विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शिंदवणे येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री पाटील म्हणाले, सर्वांनी विज प्रक्रिया करून बी.बी. एफ. सरी वरंबा पद्धतीने बियाणाची पेरणी केली तर 8 ते 10 किलो बियाणेची बचत होते. आताची वेळ ही पेरणीची आहे. या आठ दिवसात शेतकरी प्रामुख्याने पेरणी सुरु करतात, पेरणीवेळी शेतकरी बांधवांना यांना योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक असते. गाव पातळीवर आमचे कृषि सहाय्यक यांच्याकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेवून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिवाणू प्रक्रिया,किड रोग या बाबतचे महत्व विशद केले.

जिल्हा अधिक्षक अधिकारी श्री ज्ञानेश्वर बोटे यांनी कृषि संजीवनी मोहीम दि 21 जुन ने दि. 30 जुन 2021 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व गावात राबविण्यात येत आहे असे सांगितले. सदर मोहीम कालावधीत कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतक-यांना देण्याचा उद्देश आहे. कृषि संजीवनी सप्ताहात शेतकरी बांधवांनी सहभाग घेवून मिळालेले तंत्रज्ञान आत्मसात करावे त्यामुळे उत्पादनात निश्चित वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

तांत्रिक चर्चासत्रानंतर श्री शिवाजी महाडीक यांच्या शेतावर बिज प्रक्रीया व ट्रॅक्टरच्या सहाय्याने बी बी एफ यंत्राव्दारे पेरणी घेण्यात आली. या नंतर शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रगतीशील शेतकरी श्री अरुण घुले यांनी राज्यस्तरावर कृषि विभागाच्या युट्युब चॅनलव्दारे ऑनलाईन साजरा होत असलेले कृषि संजिवनी सप्ताहमध्ये सहभाग घेवून प्रतिक्रीया नोंदवली. यावेळी आयुक्त धिरजकुमार, श्री. विनयकुमार आवटे यांचे दृकश्राव्य माध्यमातून कृषिसंजिवनी सप्ताह तसेच त्यांनी राबविलेल्या फळपिक शेतीबाबतची माहीती दिली. या प्रसंगी माजी सरपंच श्री. गणेश महाडीक यांनी कृषि विभागाचे गाव पातळीवरील कामाचे समाधान व्यक्त केले

 

कृषि सहाय्यक शंकर चव्हाण यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गावच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री. अरुण घुले यांचे शेतावर शिवार फेरी घेण्यात आली यावेळी फळबाग योजना गांडूळ खत प्रकल्प, ठिबक संच, पाला पाचोळा पासून सेंद्रीय खत प्रकल्प याची पहाणी करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन तालुका कृषि अधिकारी, हवेली श्रीमती. सपना ठाकूर व मंडळ कृषि अधिकारी  हडपसर यांनी केले. प्रस्ताविक श्री गुलाबराव कडलग यांनी केले तर सूत्र संचालन पुरुषोत्तम काकडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कृषि विभागाचे श्री गणेश थस, कृषि अधिकारी व श्री. डावखर, श्री. मेघराज वाळूजकर सर्व कृषि सहाय्यक व शिदवणे गावचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. कोविड-१९ चे आदेशाचे पालन करुन सर्वांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.