पिंपरी-चिंचवड, ९ ऑगस्ट २०२२: भिमाशंकर तीर्थक्षेत्राजवळील नेरळ काशाळे या घाटातील रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्प करण्यात यावा, तसेच त्यासाठी निधी उभारण्यात यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सरकारकडे केली आहे. मावळ लोकसभेतील नेरळ काशळे या भिमाशंकर जवळील घाटाच्या मार्गांची योजना करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
भिमाशंकर येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात , हे भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. मुंबई – उरण – पनवेल येथील भाविकांसाठी कर्जत – नेरळ – काशळे असा मार्ग करणे आवश्यक आहे , त्यामुळे ५३ किलोमीटर इतके अंतर कमी होईल. या मार्गाचे काम ८० टक्के झाले आहे, तरी पुढील कामासाठी निधी कमी पडत असल्याने निधी उपलब्ध करून कामास सुरुवात करण्याची मागणी बारणे यांनी केली आहे.
More Stories
यंदाचा इंद्रायणी थडी महोत्सव तीर्थरुप आईस समर्पित
लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेला सुट्टी
पुणे: मावळातील प्राचीन वास्तू बालग्रामने आणल्या प्रकाश झोतात, हेरिटेज वॉकमध्ये ६००० हजारहून अधिक पर्यटकांचा सहभाग