पुणे, २५ जुलै २०२४ : पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे दाना दान उडालेली असताना शेकडो सोसायटीमध्ये पाणी घुसले आहे. तर हजारो वाहनांचे नुकसान झालेले आहे. नदीमध्ये पूर आल्याने धोक्याची स्थिती शहरात निर्माण झालेली आहे. असे असताना पालकमंत्री अजित पवार हे पुण्यामध्ये दाखल होत असून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मात्र दिल्लीत ठाण मांडून बसलेले आहेत.
पुण्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिप्रेप सुरू आहे. मात्र बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पावसाने चांगला जोर पकडला आहे. रात्री अकरापासून आणखीन जोरात पाऊस सुरू झाला. पहाटे पर्यंत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 118 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरणातून सकाळी 35556 क्युसेक इतक्या वेगाने पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात आले. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर नदीकाठी असलेल्या एकता नगरी, द्वारका नगरी यासह सुमारे 80 सोसायटी यांच्या पार्किंग मध्ये पाणी घुसलेले आहे .तर काही ठिकाणी पहिल्या मजल्यावरील नागरिकांच्या घरांमध्येही पाणी गेल्याने त्यांचे मोठे प्रमाण नुकसान झालेले आहे. या भागात हा हक्क उडाल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणे कडून देखील मदत कार्य सुरू करण्यात आलेले आहे. शहरातील स्थिती चिंताजनक होत असल्याने पालकमंत्री अजित पवार हे मुंबईतील कामकाज रद्द करून पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत. त्यांच्याकडून बैठका घेऊन पुढील आढावा घेतला जाणार आहे. तसेच यंत्रणेला सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिलेले आहेत व पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मात्र दिल्लीमध्येच अनेक बैठकांच्या कामकाजामध्ये व्यस्त आहेत. त्यांनी केवळ सोशल मीडियावरूनच अपडेट टाकून सक्रिय असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर देखील टीका होत आहे ते अद्याप पुण्याच्या दिशेने निघालेले नाहीत.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार