पुणे पोलीस आयुक्तालयात उपायुक्तांना झोनचे वाटप

पुणे, १५/११/२०२२:  पुणे शहर पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या पोलीस उपायुक्तांना पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत पदस्थापना देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना झोन वाटप करण्यात आले असून अंतर्गत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. यामध्ये नऊ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील सात अधिकारी नव्याने शहरात आलेले आहेत.

पुणे पोलीस आयक्तालयात नव्याने दाखल झालेले संदीपसिंह गिल यांना झोन एकची जबाबदारी देण्यात आली आहे. झोन दोनच्या प्रमुखपदी स्मार्तना पाटील, झोन तीनच्या प्रमुखपदी सूहेल शर्मा, झोन चार शशिकांत बोराटे, झोन पाचसाठी विक्रांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सध्या गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदी कार्यरत श्रीनिवास घाडगे यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.त्यांच्या जागी बदली होऊन शहरात आलेले अमोल झेंडे यांना नेमण्यात आले आहे. विजयकुमार मगर यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी असणार आहे. झोन 4 च्या प्रमुख पदी असलेले रोहिदास पवार यांच्याकडे मुख्यालयची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत आदेश काढले आहेत.