पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अँबिशियस संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 3 डिसेंबर 2022: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब 19 वर्षाखालील चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत अँबिशियस संघाने आर्यनस् आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

एसडी कटारिया हायस्कूल मैदानावर झालेल्या सामन्यात उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत निरज जोशीच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर अँबिशियस संघाने आर्यनस् संघाचा 69 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. पहिल्यांदा खेळताना अँबिशियस संघाने 47.4 षटकांत सर्वबाद 271 धावा केल्या. यात तनिष्क खेडकरने 88 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांसह 69 धावा करून संघाचा डाव बळकट केला. श्रेयस जाधवने 38 चेंडूत 8 चौकार व 1 षटकार अशी तुफानी खेळी करत अर्धशतक ठोकले. तेजस तोळसनकरने 40 धावा करून तनिष्क व श्रेयसला सुरेख साथ दिली. 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निरज जोशी व गणेश कालेल यांच्या अचूक गोलदाजीने आर्यनस् संघाचा डाव 42 षटकांत सर्वबाद 202 धावांत रोखला. ऋषी नाळेने 59 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 26 चेंडूत 4 गडी बाद करणारा निरज जोशी सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्यपूर्व फेरी
अँबिशियस: 47.4 षटकांत सर्वबाद 271 धावा (तनिष्क खेडकर 69(88,6×4,2×6), श्रेयस जाधव 51(38,8×4,1×6), तेजस तोळसनकर 40(45,7×4), विश्वजित फेगडे 29,416, 29,416 ), नित्या शहा 6-40, मृगांक रावल 2-59) वि.वि आर्यनस्: 42 षटकांत सर्वबाद 202 धावा(ऋषी नाळे 59(66,7×4,1×6), नित्या शहा 20(28,2×4,1×6), निरज जोशी 4 -26, गणेश कालेल 3-47) सामनावीर- निरज जोशी
अँबिशियस संघाने 69 धावांनी सामना जिंकला.