खडकीतील दारूगोळा कारखाना येथे स्फोटके हाताळताना एक कर्मचारी जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

पुणे, २५ जानेवारी २०२२: दारुगोळा कारखाना खडकी, पुणे ची स्थापना 1869 मध्ये झालीआहे व सध्या संरक्षण मंत्रालय, भारत सरकार च्या अंतर्गत म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे चे एक प्रमुख युनिट आहे जे भारतीय सशस्त्र दलांसाठी लघु शस्त्रे आणि दारुगोळया ची निर्मिती करीत आहे.

 

 

 

कळविण्यात येत आहे कि दारुगोळा कारखाना खड़की मध्ये दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी दुपारच्या दरम्यान स्फोटके सुकवताना/हाताळताना उत्पादन विभागात अपघात झाला । ज्‍यामध्‍ये श्री डी.आर. ठाकरे, कनिष्‍ठ कार्य व्‍यवस्‍थापक /तांत्रिक (केमिकल) जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

 

कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच इतर कोणीही जखमी झाले नाही. तत्काळ उच्चस्तरीय विभागीय चौकशीचे आदेश देऊन अपघाताचे कारण शोधले जात आहे.