पुणे, ४ जुलै २०२२ : रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी रोटरीयन अमोल कागवाडे तर सचिवपदी रोटरीयन आर डी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकतेच सेवासदन इंग्लिश मेडीयम स्कूल येथे झालेल्या पदग्रहण समारंभात त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रांतपाल डॉ अनिल परमार हे उपस्तिथ होते.
यावेळी कागवाडे यांनी नवीन वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाबाबत सांगितल्या. त्यात प्रामुख्याने पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, स्त्री सबलीकरण यासारख्या महत्वाच्या योजनांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश खाडे व भावना दफ्तरदार यांनी केले, तर लता शिंदे यांनी आभार मानले.
More Stories
उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रमांचे आयोजन
विश्वकर्मा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न