पुणे, दि. २८/०२/२०२३ – कोंढवा पोलिस ठाण्यातंर्गत दाखल गुन्ह्यात मागील एक वर्षांपासून फरार झालेल्या आणि वेषांतर करुन राहणार्या सराईतला परिमंडळ पाचच्या पथकाने अटक केली आहे. आरिफ मदार मुजावर (वय ३३, रा. इनाम मस्जिद जवळ, ताडीवाला रोड ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
शहरांतील वेगवेगळया गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या आदेशानुसार झोनमधील विविध ठाण्यातंर्गत गुन्ह्यात पसार आरोपींचा माग काढण्यात येत होता. कोंढवा ठाण्यातंर्गत दाखल गुन्ह्यात एक वर्षांपासून फरार असलेला आरिफला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस अंमलदार जयदेव भोसले व नासेर देशमुख यांनी संयुक्तिकरित्या कारवाई केली. ही कामगिरी अपर आयुक्त रंजन कुमार, उपायुक्त विक्रांत देशमुख अंमलदार राजू कदम, अमित जाधव, आनंद पाटोळे, सर्फराज देशमुख, नासेर देशमुख, जयदेव भोसले यांनी केली .

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार