संतप्त शिवसैनिकांकडून आर डेक्कन मॉलची तोडफोड

पुणे, २४/०८/२०२१: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अनुद्गार काढल्याप्रकरणी पुण्यात  शिवसैनिक आक्रमक झाले होते. आज दुपारच्या सुमारास युवा सेनेच्यावतीने गोखले स्मारक चौकात   आंदोलन केले. त्यानंतर शिवसैनिकांनी राणे यांच्या मालकीच्या डेक्कनमधील आर डेक्कन मॉलसमोर घोषणबाजी करून दगडफेक केली.  

केंद्रीय मंत्री राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने गोखले स्मारक चौकात सकाळी अकराच्या सुमारास मोठ्या संख्येने शिवसैनिक गोळा झाले.   आंदोलन सुरू असतानाच संतप्त शिवसैनिकांनी राणे यांच्या मालकीच्या आर डेक्कन मॉलवर दगडपेâक केली.  त्याशिवाय   मॉलसमोर पुन्हा घोषणाबाजी करण्यात आली.  दगडफेकीत मॉलच्या प्रवेशद्वाराच्या काचा फुटल्या आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी  डेक्कन पोलिस ठाण्याकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

पुण्यात सात ठिकाणी आंदोलन, शहरात कुठेही उद्रेक नाही-सहपोलीस आयुक्त

पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत करण्यात आलेल्या टीकेमुळे पुण्यात सात ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये डेक्कन, हडपसर, फुरसुंगी , हडपसर गाडीतळ, सिंहगड व डगाव पुल, चतःशृंगी शिवाजी चौक, बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. ठिकठिकाणी पोलीस अधिकाNयांसह कर्मचाNयांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.