पुणे, दि. 20/10/2022 – पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या अक्षीक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने गुरूवारी रात्री पोलिस अधिकाNयांच्या बदल्यांचे आदेश पारित केले आहेत. यापुर्वी ते गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. दरम्यान, डॉ. अभिनव देशमुख यांच्या बदलीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहे .
अंकित गोयल हे यापुर्वी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. त्यांनी गडचिरोलीतील ग्रामीण भागात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे गोयल चर्चेत आले होते. त्यांची नियुक्ती आता पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणूका, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी त्यांच्यासमोरे आव्हान असणार आहे.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा