पुणे: तब्बल १० लाखांचे चरस विक्रीसाठी आलेल्या तस्कराला अटक, अमली पदार्थ विरोधी पथक एकची कारवाई

पुणे, १८/०८/२०२१: रेल्वेप्रवास करून हरियानातून तब्बल १० लाख १० हजार रूपये विंâमतीचे एक किलो चरस विक्रीसाठी आणलेल्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्याच्याकडून एक किलो चरस आणि मोबाईल असा १० लाख १० हजार ५०० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विकास बब्बरसिंह इटकान (वय २२ रा. हिसार, हरियाणा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड स्टाफसह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी खडकी बाजार बसस्थानाकाजवळील रस्त्यावर एकजण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील सॅकमध्ये १० लाख रूपये विंâमतीचे एक किलो चरस आणि मोबाईल असा ऐवज मिळून आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, सुजीत वाडेकर, संदीप जाधव, राहूल जोशी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहाना शेख, नीतेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली. सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे तपास करीत आहेत.