टाटा महा ओपन 12 वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत अनुष्का जोगळेकर, मायरा शेख यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

पुणे 12 डिसेंबर 2022: पीएमडीटीए आणि पुणे पॅरेंट्स यांच्या तर्फे आयोजित, टाटा महा ओपनच्या सहकार्याने व एआयटीए एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या टाटा महा ओपन अखिल भारतीय मानांकन 12 वर्षांखालील  चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात अनुष्का जोगळेकर, मायरा शेख या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय आजचा दिवस गाजवला. 
 
 सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पहिल्या फेरीत बिगरमानांकीत अवंतिका सैनीने चौथ्या मानांकित अनुष्का जोगळेकरचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. तर, मायरा शेख हिने तिसऱ्या मानांकित सारा फेंगसेचा 5-7, 6-3, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुली:
श्रावी देवरे(1)वि.वि.नक्षत्र अय्यर 6-1, 6-0;
अवनी देसाई वि.वि.जान्हवी सावंत 6-1, 6-2;
अहाना पाटील वि.वि.रिया बंगाळे 6-1, 6-0;
विवा तलरेजा(8)वि.वि.अयाती तुडयेकर 6-4, 0-6, 7-5;
सान्वी राजू(6)वि.वि.अनिका नायर 7-5, 6-2;
ख्याती भट वि.वि.ख्याती मनीष 6-0, 6-1;
अवंतिका सैनी वि.वि.अनुष्का जोगळेकर(4) 6-2, 6-3;
मायरा शेख वि.वि.सारा फेंगसे(3)5-7, 6-3, 6-3;
ओजसी देगमवार(5) वि.वि.निशिथा घारगे 6-3, 6-3.