सनी वर्ल्ड करंडक जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद 2022 स्पर्धेत अन्वय समग, आरुष सपले, आर्यन नागवडे यांची आगेकूच

पुणे, 17 डिसेंबर, 2022: मुस्ताक बॅडमिंटन अकादमी(एमबीए) यांच्या वतीने आयोजित व पीएमडीबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सनी वर्ल्ड करंडक जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद 2022 स्पर्धेत अन्वय समग,  आरुष सपले, आर्यन नागवडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.    
 
सनी वर्ल्ड येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलांच्या गटात अन्वय समगने विस्मय म्हस्केचा 13-15,15-6,15-11 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. आरुष सपलेने समर जोशीचा 15-5,15-9 असा तर, आर्यन नागवडेने अनुज भोसलेचा 15-10,15-13 असा पराभव करून आगेकूच केली.
 
स्पर्धेत 11 वर्षाखालील मुले व मुली, 13 वर्षाखालील मुले व मुली, 15 वर्षाखालील मुले व मुली, 17 वर्षाखालील मुले व मुली, 19 वर्षाखालील मुले व मुली, पुरुष व महिला गट, 35 व 40वर्षावरील पुरुष गट आणि 15 वर्षाखालील दुहेरी या गटात एकूण 450 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे उदघाटन सनी वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक व नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 11 वर्षाखालील मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी:
यश मोरे वि.वि.राजवीर ढोका 15-4, 15-4;
अतिक्ष अग्रवाल वि.वि.हर्षिल शुक्ला 15-5, 15-10;
आरुष दुग्गल वि.वि.शौर्य चव्हाण 15-6,15-8;
पुष्कल त्रिवेदी वि.वि.आरुश सप्रे 15-11,15-9;
मीर शाहजार अली वि.वि.हिमांश हरगुनानी 15-6,15-12;
आर्यन नागवडे वि.वि.अनुज भोसले 15-10,15-13;
अन्वय समग वि.वि.विस्मय म्हस्के 
 13-15,15-6,15-11;
आरुष सपलेवि.वि.समर जोशी 15-5,15-9; 
 
13 वर्षाखालील मुले: उप-उपांत्यपुर्व फेरी: 
ध्रुव बर्वे वि.वि.साईश भुर्के 15-9,15-5;
अरहम रेडसानी वि.वि.श्रावण देशमुख 15-1,15-2;
विस्मय म्हस्के वि.वि.आदित कानेटकर 15-12,15-8;
चिन्मय फणसे वि.वि.शंतनू चोथे 15-1,15-3;
अर्जुन निकम वि.वि.समर जोशी 15-4,15-4;
अनय एकबोटे वि.वि.आदित्य देशमुख 15-6, 15-10;
अक्षर झोपे वि.वि.अन्वय समग 16-14,15-12
एल.अभिज्ञान सिंगा वि.वि.आर्यन निबे 15-7,15-2.