पुणे, ०९/०९/२०२३: महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगतर्फे वंचित विकास संस्थेने ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दि. १ ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शुभारंभ लॉन्स, डी.पी. रस्ता, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे येथे हे प्रदर्शन भरणार आहे.
उद्योजकांना अत्यल्प दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बचत गटातील महिलांची विविध उत्पादने, खाद्यपदार्थ, सिल्क साड्या, हँडमेड ज्वेलरी, कलमकारी कपडे, कलाकुसरीच्या वस्तूंचे, हस्तकला, शाळेतील मुलांनी बनवलेल्या हात कागदाच्या वस्तू, भरड धान्य, सुका मेवा, हर्बल उत्पादने, गिफ्ट आर्टिकल्स, होम डेकोरेशन, बी-बियाणे, दिवाळी फराळ, इलेक्ट्रिक व्हेईकल, वुडन क्राफ्ट, प्रसाधने आदी स्टॉल्स असणार आहेत.
महिला व्यावसायिकांना सक्षम करण्यासाठी हे प्रदर्शन महत्वपूर्ण ठरणार आहे. प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांनी वंचित विकास संस्थेच्या कार्यालयात (०२०-२४४८३०५०) किंवा तेजस्विनी थिटे (७९७२०८६७३०) किंवा मीनाक्षी नवले (९३७०८२५३६८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वंचित विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार