पुणे, 6/5/2022:- उपहारगृह, रेस्टॉरंट चालकांनी ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी उपहारगृहाच्या परिसरामध्ये दर्शनी भागात प्रवेशद्वाराच्या बाहेर, स्वागत कक्षाच्या ठिकाणी किंवा दिसेल अशा ठिकाणी अन्न सुरक्षा दर्शक ए-३ आकाराचे कार्डबोर्ड फलक उपहारगृहामध्ये लावणे केंद्रशासनाने बंधनकारक केलेले आहे. फलक न लावल्यास प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी उपहारगृह, रेस्टॉरंट चालकांनी उपहारगृहाच्या परिसरामध्ये दर्शनी भागात अन्न सुरक्षा दर्शक फलक लावण्यात यावा, असे आवाहन अन्न व औषधप्रशासन सहआयुक्त शि.स.देसाई यांनी केले आहे.
More Stories
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत 100 हुन अधिक खेळाडू सहभागी
क्रीडा प्रबोधिनीच्या मोठ्या विजयात युगची हॅटट्रिक
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत ओमर सुमर व सेजल भुतडा यांना विजेतेपद