पुणे, 27/8/2021:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी जेटी (JT) नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे.
वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (नवीन इमारत, मोशी) येथे मोठया प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो त्यामुळे नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणा-या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरुन हवे असतील त्यांनी 30 ऑगस्ट 2021 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षित नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्ज कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. सदर डीडी DY.R. T.O. PIMPRI CHINCHWAD यांच्या नावे
नॅशनलाईज/ शेडयुल्ड बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची (उदा. आधारकार्ड, टेलिफोन बील इत्यादी) साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. चारचाकीची यादी दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी कार्यालयीन नोटीस फलकावर सकाळी 11.00 वाजता लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दोष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. दुचाकीची यादी दिनांक 1सप्टेंबर 2021 रोजी कार्यालयीन नोटीस फलकावर सकाळी 11.00 वाजता लावण्यात येईल. दुचाकीसाठी अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सोलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल, वाहन क्रमांक आरक्षित केल्याचे संदेश मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून घेऊन जावे. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली शुल्क, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही,पिंपरी-चिंचवडचे
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
More Stories
चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन
विधानसभा पोटनिवडणूक चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे
यंदाचा इंद्रायणी थडी महोत्सव तीर्थरुप आईस समर्पित