ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आराध्या क्षितिज, शिवतेज शिरफुले,प्रकाश सरन यांचा दुस-या फेरीत प्रवेश

औंरंगाबाद, दि 14 नोव्हेंबर 2022: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली  ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय  टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात आराध्या क्षितिज, शिवतेज शिरफुले व प्रकाश सरन या मानांकीत खळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे  सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात कर्नाटकच्या अव्वल मानांकीत आराध्या क्षितिजने तमिळनाडूच्या नवीन राजसुंदरमचा 6-3, 6-0 असा तर महाराष्ट्राच्या तिस-या मानांकीत शिवतेज शिरफुलेने शार्दुल खवळेचा 6-4, 2-6, 6-4 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. कर्नाटकच्या पाचव्या मानांकीत प्रकाश सरन याने हरयाणाच्या शिव शर्माचा 6-2, 6-0 असा तर दक्ष पाटीलने कृशांक जोशीचा 7-6(3), 6-4 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

स्पर्धेचे उद्घाटन औरंगाबादचे पोलीस अधीक्षक श्री.मनीश कलवानिया(आयपीएस), श्री संजय दत्ता, जीएम एन्ड्युरन्स ग्रुप, सौ. वैशाली शेकटकर, स्पर्धा निरीक्षक, श्री आशुतोष मिश्रा, सेंटर प्रमुख, डॉ अश्विनी जैस्वाल फिजिओथेरपिस्ट, श्री प्रवीण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले, शंकर लबडे आणि इएमएमटीसी टीम आदी मान्यवर उपस्थित होते

 स्पर्धेचा सविस्तर निकाल:(मुख्य ड्रॉ) पहिली फेरी: मुले:

आराध्या क्षितिज(कर्नाटक)(1) वि.वि नवीन राजसुंदरम (तमिळनाडू) 6-3, 6-0

अनुज सारडा (उत्तर प्रदेश) वि.वि सनत कडले (महाराष्ट्र) 6-3, 6-2

दक्ष पाटील (महाराष्ट्र) वि.वि कृशांक जोशी (महाराष्ट्र) 7-6(3), 6-4

आयुष पुजारी (महाराष्ट्र) वि.वि मन्नान अग्रवाल (महाराष्ट्र)  6-2, 6-2

शौर्य भारद्वाज (उत्तर प्रदेश) वि.वि अद्वित तिवारी (हरयाणा) 6-4, 6-3

सार्थक गायकवाड (महाराष्ट्र) वि.वि ध्रुव सोनी (मध्य प्रदेश) 6-3, 6-2

प्रकाश सरन(कर्नाटक) (5) वि.वि शिव शर्मा(हरयाणा) 6-2, 6-0

शिवतेज शिरफुले (महाराष्ट्र) (3) वि.वि शार्दुल खवळे (महाराष्ट्र) 6-4, 2-6, 6-4

रणवीर पन्नू(कर्नाटक) वि.वि आर्यन पोथुनूरी(तेलंगणा) 6-3, 6-7(3), 6-3

अमोघ दामले (महाराष्ट्र) वि.वि अधिवान देशवाल (दिल्ली) 6-7(6), 6-1 6-1

धनंजय टिब्रेवाल (राजस्थान) वि.वि स्मित उंद्रे (महाराष्ट्र) 6-3, 6-0

प्रतिक शेओरान(हरयाणा) वि.वि रुहान कोमंडूर (कार्नाटक) 6-0, 6-1

अहान शेट्टी (महाराष्ट्र) वि.वि अथर्व शुक्ला (महाराष्ट्र) 3-6, 6-0, 6-3

फजल अली मीर (तमिळनाडू) वि.वि वीर महाजन (महाराष्ट्र) 7-6(4), 6-0

हृतिक कटकम (तेलंगणा)(8) वि.वि आदित्य आचार्य(ओडिशा) 6-4, 6-0

अर्जुन परदेशी (महाराष्ट्र) वि.वि सूर्या काकडे (महाराष्ट्र) 6-0, 6-0

क्रिस्टो बाबू (कर्नाटक) वि.वि संकल्प सहानी (पश्चिम बंगाल) 6-0, 6-1

रणवीर सिंग (हरयाणा) वि.वि अर्जुन भाटी (उत्तर प्रदेश) 6-3, 7-5