पुणे,दि.5 नोव्हेंबर 2023: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत अर्चित डहाळे, अयान शेट्टी, अर्चित धुत या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत बिगर मानांकित अर्चित डहाळेने तिसऱ्या मानांकित आरव ईश्वरचा 6-1, 6-3 असा तर, तामिळनाडूच्या प्रणव एसआर याने चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या अभिराम निलाखेचा 6-2, 6-4 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.
महाराष्ट्राच्या अयान शेट्टीने सातव्या मानांकित आपला राज्य सहकारी दिव्यांक कवितकेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. महाराष्ट्राच्या अर्चित धुतने कर्सुनाटकच्या आठव्या मानांकित सूहास सोमाचा 7-5, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.
निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
सात्विक कोलेपल्ली (महा)(1)वि.वि.नीरज जोर्वेकर (महा)6-1, 6-2;
सार्थ बनसोडे(महा)(2)वि.वि.समीहन देशमुख(महा)6-1, 6-2;
अर्चित डहाळे(महा) वि.वि.आरव ईश्वर(महा)(3)6-1, 6-3;
प्रणव एसआर (तामिळनाडू) वि.वि.अभिराम निलाखे (महा)(4)6-2, 6-4;
सर्वेश झवर (महा)(5)वि.वि.स्वर्णिम येवलेकर(महा)6-2, 6-3;
अयान शेट्टी(महा) वि. वि.दिव्यांक कवितके(महा)(7)6-3, 6-2;
अर्चित धुत (महा) वि.वि.सुहास सोमा(कर्नाटक)(8)7-5, 6-1.
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणेः
मुले: 1.पार्थ देवरूखकर (महा), 2.सात्विक कोलेपल्ली(महा), 3.जय पवार(महा), 4.अनमोल नागपुरे (महा), 5.फतेहब सिंग (महा), 6.ओंकार शिंदे (महा), 7. सार्थ बनसोडे(महा), 8.पार्थ सोमाणी(महा);
मुली: 1.हिरवा रंगणी(गुजरात), 2.अभिलिप्सा मल्लिक(महा), 3.धनवी काळे (महा), 4.श्रुती नानजकर(महा), 5.अपेक्षा कांदाडी(तेलंगणा), 6.पार्थसारथी मुंढे(महा), 7.आर्या बोरकर(महा), 8. आनंदी भुतडा(महा).
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय