नवी दिल्ली, 3 जून 2021: काश्मीर खोऱ्यातील आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात, दुसऱ्या दिवशी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी नियंत्रण रेषेवलगत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.
लष्करप्रमुखांसोबत उत्तर सैन्यदल कमांडर लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी आणि चिनार कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे यांनी एककांना भेट दिली. तिथे स्थानिक कमांडरनी सध्याच्या सुरक्षा स्थितीविषयी आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी हणून पाडण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती लष्करप्रमुखांना दिली. लष्करप्रमुखांनी सैन्याशी संवाद साधला आणि त्यांच्या उच्च मनोबलाचे आणि उच्च कार्यान्वयन सज्जतेचे कौतुक केले. नियंत्रण रेषेलगतच्या शांततेच्या सद्यस्थितीचे कौतुक करताना त्यांनी सर्व कमांडर व सैनिकांना पहारा तसूभरही कमी न करण्याचा आणि सुरक्षेशी संबंधित कुठल्याही संभाव्य आव्हानावर प्रभावीपणे मात करण्यासाठी सज्ज राहण्याचा इशारा दिला. क्षेत्रात शांतता राखण्यासाठी समन्वय राखल्याबद्दल आणि कोविड-19 साथीच्या संसर्गात लोकांना केलेल्या मदतीबाबत सरकारी संस्थांचे लष्करप्रमुखांनी कौतुक केले.
More Stories
राहुरी,अहमदनगर येथे होणारी सैन्य भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत
पुणे: लष्कराच्या दक्षिण विभाग प्रमुखांची शिवनेरी ब्रिगेडला भेट
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची दक्षिण कमांडला भेट