पुणे, १३/८/२०२१: लष्कर विधी महाविद्यालय,पुणे (आर्मी लॉ कॉलेज) येथे मुलींच्या अत्याधुनिक वसतिगृहाचे उद्घाटन दक्षिण कमांडच्या आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा अनिता नैन यांच्या हस्ते दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट 2021 रोजी झाले. या कार्यक्रमाला लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, लष्कर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक उपस्थित होते. 24 महिन्यांच्या कालावधीत 7.76 कोटी रुपये खर्च करून हे वसतिगृह बांधण्यात आले. 165 मुलींच्या राहण्याची व्यवस्था होईल इतकी या पाच मजली वसतिगृहाची क्षमता आहे. यात व्यायामशाळा आणि जेवणासाठीची आधुनिक व्यवस्था , करमणूक सभागृह आणि ग्रंथालयासारख्या सुविधा आहेत. महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी लष्कराला राधा कालियानदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टने देणगी स्वरूपात दिलेल्या जमिनीवर हे वसतिगृह बांधण्यात आले आहे.”परवडणाऱ्या किंमतीत गुणवत्तापूर्ण शिक्षण’.या लष्कराच्या दृष्टीकोनाशी अनुरूप या मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे.
More Stories
जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
पुण्यात पोलीस ठाण्यातच महिलेने प्यायले फिनाईल, आयुक्तालयानंतर कोंढव्यात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे: शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन ठार, सहकारनगर,वाघोलीत अपघात