September 24, 2025

गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अर्णव पापरकर, तनिष्क जाधव, नील केळकर यांची आगेकूच

पुणे,दि.4 डिसेंबर 2023: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अर्णव पापरकर, तनिष्क जाधव, नील केळकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या तनिष्क जाधवने कॅनडाच्या कार्तिक गुसैनचा 5-7, 6-4, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. नील केळकर याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या सार्थ बनसोडेचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. रशियाच्या एगोर शेरबाकोव्ह याने भारताच्या पार्थ देवरुखकरचे आव्हान 4-6, 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. अर्णव पापरकरने प्रणव कोरडेला 6-2, 6-1 असे सहज पराभूत केले.

मुलींच्या गटात आयशी बिश्त हिने साइइती वरदकरला 6-2, 6-2 असे नमविले. भारताच्या स्निग्धा कांताने अमेरिकेच्या आन्या चौबेवर 6-1,4-6, 6-4 असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. आकृती सोनकुसरेने अपरा खांडरेचे आव्हान 4-6, 6-0, 6-3 असे मोडीत काढले. याआधी स्पर्धेचे उदघाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे, पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, वित्तीय सचिव मिहीर केळकर, आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आणि गद्रे मरीनचे आश्विन जंगम आदी मान्यवर उपस्थित होते. क्लबचे टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुले:
स्वर्मन्यू सिंग(भारत)वि.वि.श्रीनिकेत कन्नन(भारत) 6-1, 1-6, 6-2;
तनिष्क जाधव(भारत)वि.वि.कार्तिक गुसैन(कॅनडा) 5-7, 6-4, 6-4;
कांढवेल महालिंगम अकिलांडेश्वरी(भारत)वि.वि.चंदन शिवराज(भारत) 6-3, 6-3;
ऋषिकेश सोनावणे(भारत)वि.वि.यश बहळकर (ग्रेट ब्रिटन)6-4, 3-6, 6-1;
विशाल प्रकाश (भारत)वि.वि.शिवतेज शिरफुले (भारत) 6-3, 1-6, 6-3;
प्रकाश सरन(भारत)वि.वि.अनुरव प्रकाश (भारत) 6-4, 6-4;
नील केळकर(भारत)वि.वि.सार्थ बनसोडे(भारत) 7-6(4), 6-2;
शंकर हेसनम(भारत)वि.वि.तेजस आहुजा(भारत) 6-3, 6-4;
अर्णव पापरकर(भारत)वि.वि.प्रणव कोरडे(भारत) 6-2, 6-1;
धीरज रेड्डी वेण्णापुसा(भारत)वि.वि.मनन अगरवाल(भारत) 6-3, 6-1;
वेंकट ऋषी बटलंकी(अमेरिका)वि.वि.स्मित पटेल(भारत) 6-2 6-2
एगोर शेरबाकोव्ह(रशिया)वि.वि.पार्थ देवरुखकर(भारत) 4-6, 6-4, 6-4;
बुशन होबम(भारत)वि.वि.प्रत्युश लोगनाथन (भारत) 6-4, 6-2;
संप्रित शर्मा(भारत)वि.वि.गंधर्व कोठापल्ली(भारत) 6-4, 6-1;

मुली:
आयशी बिश्त(भारत)वि.वि.साइइती वरदकर(भारत) 6-2, 6-2;
स्निग्धा कांता(भारत)वि.वि.आन्या चौबे(अमेरिका) 6-1,4-6, 6-4;
आकृती सोनकुसरे(भारत)वि.वि.अपरा खांडरे(भारत)4-6, 6-0, 6-3;