अरुणकुमार अचलकर यांचे निधन

पुणे, 28 नोव्हेंबर 2022 : अरुणकुमार मुकुंदराव अचलकर (वय ८५) यांचे २७ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी हेमा अचलकर, दोन मुलगे, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. सुप्रसिद्ध वास्तुविशारद विकास अचलकर यांचे ते वडील होत. अरुणकुमार अचलकर यांचे शालेय शिक्षण हे धारवाड, हुबळी येथून झाले होते. ज्युनिअर अभियंते ते प्रमुख अभियंते असा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामधील त्यांचा प्रवास उल्लेखनीय होता. एमएसईबीच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंते म्हणून ते निवृत्त झाले होते.