पुणे, दि.4 जानेवारी 2025: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित व आयकॉन ग्रुप पुरस्कृत अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पीवायसी अ, टेनिसनट्स रॉजर, एमडब्ल्यूटीए अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पीवायसी अ संघाने महाराष्ट्र मंडळ 1 संघाचा 18-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. पीवायसी अ संघाकडून योगेश पंतसचिव, प्रशांत गोसावी, अमित लाटे, केदार देशपांडे, सारंग देवी, तन्मय चोभे यांनी सुरेख कामगिरी केली.
दुसऱ्या लढतीत जयदीप वाकणकर, भूषण जोशी, विवेक खडगे, रोहन देशपांडे यांच्या अफलातून खेळीच्या जोरावर एमडब्ल्यूटीए अ संघाने टेनिसनट्स राफा संघाचा 17-16 असा संघर्षपूर्ण पराभव केला. संदीप बेलुडी, सलील कुंचूर, रवी कोठारी, अमित किंडो, नितीन सावंत, राहुल कोठारी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर टेनिसनट्स रॉजर संघाने एमडब्ल्यूटीए क संघाचा 18-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
पीवायसी अ वि.वि.महाराष्ट्र मंडळ 1 18-3(90 अधिक दुहेरी: योगेश पंतसचिव/प्रशांत गोसावी वि.वि.संजय सेठी/अर्पित श्रॉफ 6-1; खुला दुहेरी: अमित लाटे/केदार देशपांडे वि.वि. अभिषेक चव्हाण/विक्रम श्रीश्रीमळ 6-1; खुला दुहेरी: सारंग देवी/तन्मय चोभे वि.वि.महिलापाल राठोड/अर्जुन वाघमारे 6-1);
एमडब्ल्यूटीए अ वि.वि.टेनिसनट्स राफा 17-16(90 अधिक दुहेरी: जयदीप वाकणकर/भूषण जोशी वि.वि.सुनील लुल्ला/सुधीर पिसाळ 6-5(7-4); खुला दुहेरी: विवेक खडगे/रोहन देशपांडे वि.वि.दुर्दम्या/दिपक पाटील 6-5(7-2); खुला दुहेरी: आशिष मणियार/संतोष रणसुभे पराभुत वि.अतुल करमपूरवाला/राहुल मंत्री 5-6(4-7)
टेनिसनट्स रॉजर वि.वि.एमडब्ल्यूटीए क 18-2(90 अधिक दुहेरी: संदीप बेलुडी/सलील कुंचूर वि.वि.अमेय पुराणिक/आशिष अरोरा 6-0; खुला दुहेरी: रवी कोठारी/अमित किंडो वि.वि.नितीन गवळी/सुनील 6-1; खुला दुहेरी: नितीन सावंत/राहुल कोठारी वि.वि.हरकिरत सिंग/संतोष शहा 6-1);

More Stories
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कीर्तना रागिनेनी, नाव्या शर्मा, अव्यक्ता रायावरपू, नमित भाटिया, सक्षम भन्साळी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत रिशीता यादव हिला दुहेरी मुकुटाची संधी
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मयंक राजन, रोहन बजाज, रिशीता यादव, स्वरा जावळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश