पुणे, दि. २८/०७/२०२२- रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास थांबलेल्या दोघांनी दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली. दुचाकीस्वारानेही त्यांना लिफ्ट दिली. मात्र, काही अंतरावर दोघा चोरट्यांनी तरूणाला धमकावून ताब्यातील दुचाकीच चोरून नेल्याची घटना २४ जुलैला रात्री बाराच्या सुमारास साळुंखे विहार रस्ता परिसरात घडली.
याप्रकरणी रोहित रामप्रसाद वर्मा (वय १८, रा. गणेशनगर, वानवडी) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याचा एक साथीदार फरार आहे. आकाश गुप्ता (रा. मार्वेâटयार्ड ) यांनी तक्रार दिली आहे.
आकाश हे २४ जुलैला रात्री बाराच्या सुमारास साळुंखे रस्ता परिसरातून दुचाकीवर चालले होेते. त्यावेळी रस्त्यावर थांबलेल्या दोघांनी हात दाखवून लिफ्ट मागितली. त्यामुळे आकाशने दुचाकी थांबवून दोघांनाही गाडीवर बसविले. काही अंतर पार केल्यानंतर दोघा चोरट्यांनी आकाशला दमदाटी करून ३० हजारांची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सीसीटीव्ही पुâटेजच्या मदतीने आरोपी रोहित वर्मा याला अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या पथकाने केली.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा