विरूद्ध दिशेने दुचाकी चालविल्याची विचारणा केल्यामुळे रिक्षाचालकाला बदडले

पुणे, दि.२५ मे २०२१: रस्त्याने दुचाकीवर विरूद्ध दिशेने आल्याचा जाब विचारल्यामुळे तरूणाने रिक्षाचालकाला लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना कात्रजमध्ये घडली. याप्रकरणी जिशान शेख (वय १८, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिशान यांचे वडील रिक्षाचालक असून काल दुपारी ते संतोषनगर परिसरातून चालले होते. त्यावेळी दोघेजण दुचाकीवर विरूद्ध दिशेने चालले होते. त्यामुळे जिशान यांच्या वडिलांनी दोघांना विरूद्ध दिशेने का आला, असा जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे दोघांनी इतर साथीदारांना बोलावून जिशान यांच्या वडिलांना लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करीत आहेत.