कात्रजमध्ये किराणा दुकानदारावर कोयत्याने वार

पुणे, दि. ५ (प्रतिनिधी)-   भांडणासंदर्भात पोलिसांना माहिती देत असल्याच्या गैरसमजुतीतून टोळक्याने  किराणा माल विक्री दुकानदारावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री साडेआठच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगरमध्ये घडली. याप्रकरणी ऋतिक कांची (रा. संतोषनगर, कात्रज) याच्यासह तीन साथीदारांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दत्ता नथू जाधव (वय ४४ ) यांनी तक्रार दिली आहे.
दत्ता आणि ऋतिक एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोन दिवसांपुर्वी   दत्ता यांच्या दुकानासमोर काही मुले भांडण असताना ते फोनवर बोलत होते. त्यामुळे दत्ता पोलिसांना फोन करून भांडणाची माहिती देत असल्याच्या गैरसमजुतीतून ऋतिकने शर्टमध्ये लपविलेल्या कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मचाले तपास करीत आहेत.