पुणे, दि. ११ मे २०२१: पोलिस हवालदाराच्या खून प्रकरणातील संशयित महिला आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या तपास पथकावर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद थाना नंद ग्राम क्षेत्र परिसरात स्थानिक जमावाने हल्ला केला आहे. जमावाने पोलिसांवर दगडफेक करत मोटारीची तोडफोड केली. त्याशिवाय स्थानिक पोलिसांसह पुणे पोलिसांच्या पथकातील काही कर्मचाNयांना मारहाण केली. हल्ल्यानंतरही पोलिस पथकाने हिंम्मत न हारता संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे. सोमवारी दुपारी (दि.१०) ही घटना घडली आहे. याप्रकरणी गाझीयाबाद पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मारहाण करीत वाहन तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बुधवार पेठेत ५ मे रोजी मध्यरात्री तडीपार गुंड प्रवीण महाजन याने पोलीस हवालदार समीर सय्यद यांचा चाकूने वार करून खुन केला होता. प्रकरणातील संशयित महिला प्रवीण महाजनबरोबर होती. संबंधित महिला गाझियाबादला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील आणि चार पोलीस सहकारी खासगी गाडीने गाझियाबाद येथे गेले होते. तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेत पुणे पोलिसांनी महिला थांबलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी स्थानिकांनी त्यांना विरोध करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पथकावर दगडफेक करीत मोटारीची तोडफोड केली.
खूनाच्या तपाससासाठी फरासखाना पोलीस ठाण्याचे पथक उत्तर प्रदेशातील गाझियाबादला गेले आहे. त्यावेळी स्थानिकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आहे. मात्र, कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी जखमी झालेले नाही. संशयित महिलेला ताब्यात घेतले असून तिला घेऊन पथक पुण्याकडे निघाले आहेत.
-राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक फरासखाना पोलिस ठाणे
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार