हडपसरमध्ये कोयत्याचे धाकाने महिलेचे मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न

पुणे, १९ मे २०२१: कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हडपसरमधील भोसले गार्डन परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला काल सकाळी सव्वा सहाच्या सुमारास भोसले गार्डन परिसरात व्यायाम करीत होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने आरडा-ओरड केल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.