दुकानमालकाने विनयभंग केल्यामुळे तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न; कर्वेनगरमध्ये जेष्ठ दुकानमालाकाविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे, ३१ मे २०२१: आईस्क्रीम आणण्यासाठी दुकानात गेलेल्या एका १९ वर्षीय तरूणीचा ६१ वर्षीय जेष्ठ दुकान मालकानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना २८ मे ला रात्री दहाच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील कबीर सुपर मार्वेâटमध्ये घडली आहे. त्यानंतर तरूणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी गौतमदास रामदास वैष्णव (वय ६१) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानमालकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरूणीचे आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपुर्वी तरूणी कर्वे रस्त्यावरील कबीर सुपर मार्वेâटमध्ये आईस्क्रीम आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुकानमालक गौतमदासने तरूणीला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने जवळ ओढून तिचा विनयभंग केला. त्यामुळे तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरूणीच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.