पिंपरी, दि. १० डिसेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक ३२ मधील जुनी सांगवी परिसरात असणाऱ्या कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळेसमोरील कचरा निर्मूलन करत तेथे आकर्षक पद्धतीने सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहर स्वच्छतेसोबतच सौंदर्यीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळेसमोरील रस्त्याच्या कडेला असणारे पूर्वीचे कचरा संवेदनशील स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे. येथील जागा स्वच्छ, सुंदर आणि उपयोगी बनवण्यात आली आहे. नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारा हा उपक्रम परिसरातील पर्यावरण सुधारण्यातदेखील सकारात्मक ठरत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक संदीप राठोड तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, महापालिकेकडून शहरातील कचरा संवेदनशील ठिकाणांचे निर्मूलन, सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी देखील सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

More Stories
इलेक्ट्रिक वाहनांना टोलची रक्कम परत मिळणार – शंकर जगताप
धोरणात्मक निर्णय; सोसायटीच्या ”एनओसी”शिवाय दारू दुकानांना परवानगी नाही-आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवडमध्ये स्वच्छता नियमभंग करणांवर महापालिकेची धडक; नोव्हेंबर महिन्यात २८ लाखांहून अधिक दंडाची वसुली