पुणे, 28/07/2025: पुणे शहर तसेच आजुबाजूच्या परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून पुण्यातील खडकवासला धरण परिसरातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलं असून २५ हजार क्युसेक ने पाण्याचं विसर्ग वाढविण्यात आलं असल्याने पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल बाबा भिडे पूल पाण्याखाली गेल आहे.भिडे पुलावर पुणे मेट्रोकडून सुरू असलेल काम देखील यामुळे थांबविण्यात आलं असून आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २८ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान कोकण गोवा येथे बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.किनारपट्टी वर सोसाट्याच्या वारा वाहण्याची शक्यता आहे.तसेच मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.आणि विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
More Stories
Pune: बाराशे खड्डे बुजवूनही अनेक ठिकाणी खड्डे
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ
“एकीकडे खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणायचं, आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल