पुणे, 19 ऑक्टोबर 2022: उपविभागीय दंडाधिकारी बारामती यांनी शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागात सार्वजनिक सुरक्षिततेच्यादृष्टीने शोभेची दारू व फटाके साठा केलेल्या दुकानापासून १०० मीटर परिसरात धुम्रपान करणे, कोणत्याही प्रकारचे दारू काम करणे व कोणत्याही प्रकारचे फटाके उडवणे या सर्व गोष्टीवर बंदी घालण्याचे आदेशीत केले आहे.
शोभेच्या दारू रॅकेटचे परिक्षण देखील या परिसरात करता येणार नाही. हे आदेश शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी (पोलीस आयुक्तालय, पुणे शहर यांच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त) १९ ते २७ ऑक्टोबर या कालावधीसाठी लागू राहतील.
प्रशासनाच्या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील, असे उपविभागीय दंडाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी कळविले आहे.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा