पॅराग्लायडींग हॉट बलून उड्डाणांना बंदी: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पॅराग्लायडींग हॉट बलून उड्डाणांना बंद

पुणे, 4/3/2022: पंतप्रधान महोदय यांचा 6 मार्च रोजी पुणे शहरात दौरा होणार आहे. त्या अनुषंगाने व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

 

पंतप्रधान यांच्या दौऱ्यानिमित्त व्हीव्हीआयपी यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी ५ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ मार्चच्या मध्यरात्री १२ वा. पर्यंत पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून अशा प्रकारची अवकाश उड्डाणे करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

आदेशाचे उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनियम कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.