एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सार्थ बनसोडेचा मानांकित खेळाडूवर विजय 

पुणे, 16 मे 2022: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए 18वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या सार्थ बनसोडे याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

 

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत मुलांच्या गटात पुण्याच्या सार्थ बनसोडे याने सहाव्या मानांकित अनिश रांजळकरचा 6-0, 6-2 असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित अर्जुन अभ्यंकरने सौमिल चोपडेचा 3-6, 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. क्वालिफायर सिद्धार्थ मराठेने दिव्यांक कवितकेचा 6-2, 6-1 असा तर, अभिराम निलाखेने केशव नाहाटाचा टायब्रेकमध्ये 7-6(2), 7-6(2) असा पराभव करून आगेकूच केली. पियुश जाधवने आदित्य तलाटीचे आव्हान 6-3, 7-6(8-6) असे संपुष्ठात आणले.

 

मुलींच्या गटात रिद्धी शिंदेने अवंती वाघचा 6-2, 6-2 असा तर, सातव्या मानांकित सेजल भुतडाने निशिता देसाईचा 6-0, 6-1 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुले:

अर्जुन अभ्यंकर(महा)[1]वि.वि.सौमिल चोपडे 3-6, 6-3, 6-4;

आश्विन नरसिंघानी(महा)वि.वि.आदित्य आयंगर(महा)6-3, 6-4;

ओमर सुमर(महा)[5]वि.वि.अहान डे(महा)6-0, 6-0;

साहिल तांबट(महा)[3]वि.वि.सर्वेश झावर(महा)6-1, 6-1;

सिद्धार्थ मराठे(महा)वि.वि.दिव्यांक कवितके(महा)6-2, 6-1;

अभिराम निलाखे(महा)वि.वि.केशव नाहाटा(महा) 7-6(2), 7-6(2);

राघव अमीन(महा)[8]वि.वि.ध्रुव साळुंखे(महा)6-1, 6-1;

सार्थ बनसोडे(महा)वि.वि.अनिश रांजळकर(महा)[6] 6-0, 6-2;

पार्थ देवरुखकर(महा)[4]वि.वि.आर्यन देवकर(महा)6-4, 5-7, 6-3;

अर्णव कोकणे(महा)[7]वि.वि.अथर्व बिराजदार(महा)6-4, 6-4;

पियुश जाधव(महा)वि.वि.आदित्य तलाटी(महा)6-3, 7-6(8-6);

अनमोल नागपुरे(महा)[2]वि.वि.चन्नामल्लिकअर्जुन यले 3-6, 6-1, 6-3;

 

मुली:

जेएस साई श्रीया(महा)[1] वि.वि.श्रेया पठारे(महा)6-0, 6-2;

श्रावणी देशमुख(महा)वि.वि.हिया मेहता(तेलंगणा)6-2, 6-2;

रिद्धी शिंदे(महा)वि.वि.अवंती वाघ(महा)6-2, 6-2;

सेजल भुतडा(महा)[7]वि.वि.निशिता देसाई(महा)6-0, 6-1;

सोनिका जडिश(कर्नाटक)वि.वि.रितिका मोरे(महा)6-0, 6-3;

प्रिशा शिंदे(महा)वि.वि.देवांशी प्रभुदेसाई(महा)6-0, 6-0.