हॉटेल रॉक्सी चे मालक बशीर अहमद शेख पीएम यांचे निधन

पिंपरी, ३०/०१/२०२२: केरळ मधील कासरगोड उप्पाल्ला येथे मूळगावी आज सकाळी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, ८ भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.

 

पिंपरी चिंचवड मधील हॉटेल रॉक्सी, ओमेगा, प्रेष्टिज, सिटी पॅलेस अशी त्यांची हॉटेल व्यवसायाची चेन होती. पिंपरी चौकात त्यांनी १९६७ मध्ये रॉक्सी हॉटेल सुरू केले होते.

 

शहरातील अनेक राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे हे हॉटेल साक्षीदार राहिले आहे. शेख कुटुंबीयांनी त्यानंतर शहरात चार हॉटेल सुरू केली. कारोना काळात त्यांनी सामाजिक भान राखत आपले हॉटेल फ्रंट लाइन वर्कर्स ना राहण्यासाठी (आयसोलेट होण्यासाठी) उपलब्ध करून दिले होते.

 

शहरातील मुख्य चौक त्यांच्या हॉटेल रॉक्सी या नावानेच ओळखला जात आहे. त्यांच्या आकाली जाण्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.