विवो प्रो कबड्डी स्पर्धेत बंगाल वॉरियर्स संघाचा गुजरात जायंटस् संघावर मात

पुणे, 5 नोव्हेंबर 2022: मशाल स्पोर्टस यांच्या वतीने आयोजित नवव्या विवो प्रो कबड्डी स्पर्धेत साखळी गटात बंगाल वॉरियर्स संघाने गुजरात जायंटस् संघाचा 45-4 0अशा फरकाने पराभव केला. कर्णधार मनिंदर सिंगने सामन्यात अफलातून कामगिरी करत सर्वाधिक 20गुणांचा कमाई करुन दिली.

शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत सामन्यात बंगाल वॉरियर्स संघाने सुरेख सुरुवात करत गुजरात जायंटस् संघावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. सुरुवातीला गुजरात संघाच्या राकेशच्या काही अप्रतिम चढाईमुळे गुजरात संघाने 9व्या मिनिटाला 10-8 अशी आघाडी घेतली. परंतु बंगाल वॉरियर्स संघाने 12व्या गुजरात वर लोण चढवताना 14-12 अशी निसटती आघाडी मिळवली

लवकरच मनींदर सिंगने केलेल्या सुपर रेड मुळे बंगाल संघाला 21-14 अशी भरीव आघाडी घेता आली. दिपक हुडाने प्रतीक दहियाची पकड करून गुजरातवर आणखी एक लोण चढवल्यामुळे बंगालचे वर्चस्व कायम राहिले. शिवाय मनिंदारच्या चढायांमुळे बंगाल संघाने मध्य तराला 32-1 8असे वर्चस्व मिळवले.

गुजरात संघाने उत्तरार्धात वेगवान खेळ केला तरीही बंगाल संघाने 25व्या मिनिटाला 33-21 अशी आघाडी राखली होती. मात्र गुजरात संघाने 28व्या मिनिटाला बंगाल वर पहिला लोण चढवला आणि मनिंदरची पकड करताना 32व्या मिनिटाला आपली पिछाडी 31-37अशी कमी केली. इतकेच नव्हे तर बंगाल वर पुन्हा एकदा लोण चढवताना गुजरात संघाने 38-36 अशी आघाडी ही घेतली.परंतु अखेरच्या काही मिनिटांत बंगाल संघाने कमालीचा संयम दाखवताना काही मोक्याचे गुण मिळवले आणि मिळालेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना 45-4 0अशा विजयाची नोंद केली.

Venue: Shree Shivchhatrapati Sports Complex, Balewadi, Pune