September 24, 2025

वैभव व शुभमच्या बचावामुळे बंगाल वॉरियर्सचा तेलगु टायटन्सवर विजय

मुंबई, 9 जानेवारी 2024: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत वैभव गरजेच्या अप्रतिम बचावाच्या जोरावर बंगाल वॉरियर्स संघाने तेलगु टायटन्स संघाचा 46-26 असा पराभव करताना आपली चार पराभवांची मालिका संपुष्टात आणली. वैभवने 9पकडी करताना विजायात एकहाती मोलाचा वाटा उचलला. टायटन्सचा कर्णधार पवन सेहरावतने सुपर 10 गुणांची नोंद करूनही त्याला पराभव टाळता आला नाही.

एनएससीआय स्टेडियम झालेल्या या लढतीत खरे तर बंगाल वॉरियर्स संघ कर्णधार व अव्वल आक्रमक मनिंदर शिवाय मैदानात उतरला. मात्र त्याच्या जागी खेळणाऱ्या नितीन कुमारने वेगवान चढायानी टायटन्सला झुंजवले. आजचा कर्णधार शुभम आणि वैभव यांच्या कामगिरी मुळे सात मिनिटात टायटन्सवर पहिला लोन चढवून वॉरियर्स संघाने 10-4 अशी आघाडी घेतली.

वैभवने टायटन्सचा कर्णधार पवनला पेचात पकडून आपला सहावा पकडीचा गुण मिळवला. त्यामूळे मध्यंतरास टायटन्स वर दुसरा लोन चढवून वॉरियर्स संघाने 27-10अशी आघाडी घेतली.

उत्तरार्धात टायटन्स संघाने पुनरागमनाचा जोरदार प्रयत्न केला. 33व्या मिनिटाला पवनने एकाच चढाईत शुभम व आदित्यला बाद केल्यामुळे तेलगू टायटन्सने वॉरियर्स वर पहिला लोन चढवून आपली पिछाडी 24-33 अशी कमी केली. मात्र नितीनने संदीप व मोहित यांना एकाच चढाईत बाद केल्याने वॉरियर्स ला टायटन्स वर तिसरा लोन चढवता आला.

केवळ दोन मिनिटे बाकी असताना शुभमने पवन आणि रॉबिन चौधरी च्या पकडी करून आपल्या पाचव्या गुणाची आणि संघाच्या चौथ्या विजयाची नोंद केली.

Pro Kabaddi League Season 10, 2023 

Points Table 

Position 

Team 

Matches 

Won 

Lost 

Tied 

Points 

Score Diff 

Points conceded 

Points scored 

1

Puneri Paltan

10

9

1

0

46

138

272

410

2

Dabang Delhi K.C.

11

7

3

1

40

31

363

394

3

Gujarat Giants

11

7

4

0

39

23

366

389

4

Jaipur Pink Panthers

10

6

2

2

38

37

302

339

5

U Mumba

10

6

4

0

32

14

373

387

6

Haryana Steelers

10

6

4

0

31

-21

382

361

7

Bengaluru Bulls

12

5

7

0

31

-40

426

386

8

Patna Pirates

11

5

6

0

29

16

415

431

9

Bengal Warriors

11

4

5

2

28

-6

419

413

10

U.P. Yoddhas

11

3

7

1

21

-10

404

394

11

Tamil Thalaivas

10

2

8

0

14

-44

374

330

12

Telugu Titans

11

1

10

0

9

-138

483

345